Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

बहुजन समाज पार्टी कडून शिवजयंती उत्साहात साजरी

 प्रतिनिधी -शंकर गायकवाड 

नागपूर, महाल : स्वराज्याचे संस्थापक बहुजन राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टी (बसपा) तर्फे महाल येथील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी रंजनाताई ढोरे, राजकुमार बोरकर, योगीराज लांजेवार तसेच नगरसेविका हर्षला जयस्वाल यांनी उपस्थित राहून शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.


कार्यक्रमादरम्यान “छत्रपती शिवाजी महाराज आपका मिशन अधूरा बीएसपी करेंगे पूरा”, “मा जिजाऊ अमर रहे”, “छत्रपती शिवाजी महाराज अमर रहे”, “छत्रपती संभाजी महाराज अमर रहे”, “जय शिवराया जय भिमराया”, “महापुरुषों के सम्मान में बीएसपी मैदान में”, “भारतीय संविधान के सम्मान में बीएसपी मैदान में”, “व्होट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा”, “ईव्हीएम की सरकार नहीं चलेगी”, “जो बहुजन की बात करेगा वह दिल्ली से राज करेगा”, “बीएसपी की क्या पहचान—नीला झेंडा, हाथी निशान” अशा उत्साहवर्धक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

याप्रसंगी माजी नगरसेवक संजय जयस्वाल, गौतम पाटील, माजी जिल्हा प्रभारी विलास सोमकुवर, युवा नेते सदानंद जामगडे, चंद्रशेखर कांबळे, अभिलेश वहाने, उमेश मेश्राम, विलास पाटील, माया ऊके, मिलिंद गजभिये, रोहित वालदे, अभय डोंगरे, भानुदास ढोरे, अमित गजभिये, संघर्ष वानखेडे, निखिल नंदेश्वर, संभाजी लोखंडे, परेश जामगडे, बागडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असून, शिवजयंती निमित्त सामाजिक एकता व संविधान मूल्ये जपण्याचा संदेश देण्यात आला.



Post a Comment

0 Comments