Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

कर्जत येथे ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशनची बैठक संपन्न



प्रतिनिधी - आनंदा भालेराव 

कर्जत : ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन मुंबई मंडळाच्या कर्जत-नेरळ शाखेच्या वतीने आज दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता कर्जत रेल्वे स्टेशन येथे सेवानिवृत्त कामगारांच्या विविध अडचणींबाबत बैठक आयोजित करण्यात आली.


या बैठकीस कर्जत-नेरळ शाखेचे अध्यक्ष काॅ. राजू जगताप उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी.पी.ओ. (PPO) व कागदपत्रांमध्ये सेवानिवृत्त कामगारांचे अडनाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक अर्ज भरून घेण्याचे काम करण्यात आले.


तसेच एन.आर.एम.यू. कर्जत शाखेचे सचिव काॅ. राजेंद्र साळुंके यांनी उपस्थित सेवानिवृत्त कामगारांना मार्गदर्शन करत त्यांच्या शंकांचे निरसन केले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक शुक्रवार युनियन कार्यालयात पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहून सहाय्य करणार असल्याची माहिती देण्यात आली.


या बैठकीला परिसरातील अनेक सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments