कार्यकारी संपादक रितेश साबळे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या धोरणांमुळे भारताची प्रतिमा कमी होत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. Prakash Ambedkar यांनी केला आहे. पंतप्रधान Narendra Modi हे ट्रम्प यांच्या दबावाखाली निर्णय घेत असल्याचा दावा त्यांनी केला.
आंबेडकर यांनी म्हटले आहे की, रशियाकडून तेल खरेदीबाबतचे धोरण, कृषी क्षेत्र परदेशी बाजारासाठी खुले करण्याचा निर्णय तसेच वस्त्रोद्योगावरील टेरिफ दर २.५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा मुद्दा हे सर्व निर्णय देशहिताला बाधक ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची भूमिका देशासाठी अपमानास्पद असल्याची टीका त्यांनी केली.
तसेच, या विषयावर व्यापक चर्चा होणे गरजेचे असल्याचे सांगत आंबेडकर यांनी विरोधी पक्षनेते Rahul Gandhi आणि काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge यांना पत्र लिहून सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलवावी, अशी मागणी केली आहे. या मुद्द्यावर देशव्यापी जनआंदोलन उभारण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशाच्या सार्वभौमत्वाशी संबंधित प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन स्पष्ट भूमिका मांडावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


Post a Comment
0 Comments