प्रतिनिधी - शंकर गायकवाड
भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाल्या मामा ) म्हात्रे यांनी मुरबाड रेल्वे प्रकल्पासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीस ठाण्याचे जिल्हाधिकारी Dr. Shrikrishnanath Panchal प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी अपेक्षित असलेल्या एकूण खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जमीन संपादन व भूसंपादन प्रक्रियेची सद्यस्थिती, रेल्वे मार्गाच्या बांधकामाचा अंदाजित खर्च तसेच इतर पूरक कामांसाठी लागणाऱ्या निधीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती घेण्यात आली.
राज्य शासनाच्या वतीने नव्याने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवरही चर्चा करण्यात आली. संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची नोंद घेऊन प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांबाबत दिशा ठरविण्यात आली. या बैठकीस रेल्वे विभाग व भूसंपादन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रकल्पाला गती देण्यासाठी परिपूर्ण व अचूक खर्च निश्चितीचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे सादर करावा, अशा स्पष्ट सूचना खासदार म्हात्रे यांनी दिल्या.
मुरबाडच्या सर्वांगीण विकासासाठी हा रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, तो वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment
0 Comments