प्रतिनिधी - मोहन दिपके
येहळेगाव (सो.), ता. औंढा नागनाथ : भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा हिंगोली अंतर्गत येहळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात संपन्न झाला. दहा दिवस चाललेल्या या शिबिरात महिलांना धम्माचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना आद. डॉ. युवराज जी. मोरे (बौद्धाचार्य), वरिष्ठ केंद्रीय शिक्षक तथा ऑडिटर, ऑडिट कमिटी, महाराष्ट्र राज्य यांनी धम्माचे महत्त्व, संघटनात्मक बांधिलकी व समाजप्रबोधनाची गरज यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांनी धम्म प्रचार-प्रसारात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
या शिबिरासाठी दहा दिवस प्रशिक्षण देणाऱ्या केंद्रीय शिक्षिका आद. वैशालीताई गोटे (अकोला) व आद. सुनिताताई आवटे (जिल्हाध्यक्ष, महिला विभाग, हिंगोली) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास बसमत तालुकाध्यक्ष आद. बालाजी मोरे, कोषाध्यक्ष सरोदे, जिल्हा उपाध्यक्ष (स्वरक्षण विभाग) आयु. पडघन, ॲड. रणजित धबडगे (शहर सचिव), उषाताई काशिदे (कोषाध्यक्ष), खंडागळे ताई (हिशोब तपासनीस), मीनाताई जमदाडे, डॉ. यादव काशिदे (तालुका उपाध्यक्ष), पुरभाजी घोंगडे (तालुका उपाध्यक्ष संस्कार), सचिन बगाटे (तालुका संघटक), विजयकुमार दीपके (तालुका सचिव), महेंद्रभाऊ घोंगडे, संजय घोंगडे, प्रताप घोंगडे, मोहन दीपके सर, वसंतराव बगाटे, गजभार गुरुजी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औंढा तालुकाध्यक्ष आद. राहुल घोंगडे होते. सूत्रसंचालन आयुष्यमानिनी सुधाताई घोंगडे यांनी तर प्रास्ताविक सुजाताताई घोंगडे यांनी प्रभावीपणे केले. आभार प्रदर्शन आयु. नि. अर्चना कपिल घोंगडे यांनी केले.
समारोपावेळी शिबिरार्थी महिलांनी आपले मनोगत व्यक्त करून धम्माचा प्रचार-प्रसार करण्याची ग्वाही दिली. सरण्यतय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




Post a Comment
0 Comments