Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

कल्याण मुख्य रुग्णालयात रेल्वे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण शिबिर.

 


प्रतिनिधी-आनंदा भालेराव 

ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन मुख्यालय, मुंबई मंडळ तसेच एनआरएमयू कल्याण को-ऑर्डिनेशन शाखेच्या वतीने आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मध्य रेल्वे मुख्य रुग्णालय कल्याण येथे विशेष तक्रार निवारण उपक्रम राबविण्यात आला.


वेणु पी नायर (महामंत्री, मध्य रेल्वे व कोकण रेल्वे) यांच्या आदेशानुसार आयोजित या उपक्रमात सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध आरोग्यविषयक तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. यामध्ये बीपी, शुगर, दमा, किडनीचे आजार तसेच इतर गंभीर आजारांबाबतच्या अडचणींचा समावेश होता. सर्व तक्रारी संकलित करून मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO, KYN) यांची भेट घेऊन त्वरित निवारणासाठी पाठपुरावा करण्यात आला.

या उपक्रमास मुख्यालयातून व्ही आनंदन (महामंत्री), रसिक मलबारी (कार्यकारी अध्यक्ष), पी जे शिंदे (सचिव, AIRF) यांनी मार्गदर्शन केले. मुंबई मंडळातून जे एन पाटील (अध्यक्ष), वसंत कासार (ऑर्गनायझेशन सेक्रेटरी), अरुण मनोरे (कार्यकारी अध्यक्ष), आनंदा भालेराव (सचिव) तसेच नारायण सोनावणे (उपाध्यक्ष) उपस्थित होते.


याशिवाय कसारा शाखेचे प्रल्हाद खंदारे (अध्यक्ष), दिलीप शिंदे (ऑर्गनायझेशन सेक्रेटरी), कल्याण मेन शाखेचे चंद्रकांत बिन्नर (अध्यक्ष), सुनिल कोलेकर (कार्यकारी अध्यक्ष), शिवाजी देवकर (उपाध्यक्ष), वासिंद शाखेचे नंदु बोंडवे (अध्यक्ष), इगतपुरी शाखेचे अहमद खान (सचिव) तसेच सुनिल ठेंगे, रविंद्र कापडे, अक्षय इंगळे, प्रशांत वाकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामुळे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांना आपल्या आरोग्यविषयक तक्रारी थेट मांडण्याची संधी मिळाली असून, संबंधित अधिकाऱ्यांमार्फत लवकरात लवकर निवारण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. रेल्वे पेन्शनरांच्या हितासाठी संघटनेचे कार्य पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.



Post a Comment

0 Comments