प्रतिनिधी- मोहन दिपके
आयुक्त समाज कल्याण पुणे मा.दीपा मुधोळ मुंडे मॅडम (IAS)यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन केले. तसेच त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करून शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती दिली. यापुढे देखील दुर्बल घटकातील व मागासवर्गीय समाजातील महिलांना येणाऱ्या अडचणींवरती समन्वयाने मार्ग काढण्याचे आश्वासन देखील त्यांनी उपस्थित महिलांना दिले.
यावेळी राज्यातील 889 खून प्रकरणांमध्ये शासकीय नोकरी देण्याचा शासन निर्णय शासनाने नोव्हेंबर 2025 मध्ये घेतल्याने आयुक्त समाज कल्याण पुणे दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांचा नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस एन.डी.एम जे या सामाजिक संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेमध्ये विधवा परितक्त्या व पारलिंगी समुदायाला शासनाने प्राधान्य दिलेले आहे याबद्दलची माहिती देण्यात आली. दिवसभर तज्ञ वक्त्यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी दिल्लीहुन केंद्रीय समन्वयक देबजानी शाहू यांनी प्रास्ताविक केले. पार्टीचे प्रकल्प संचालक सहारे सर यांनी बार्टीच्या विविध योजनांची माहिती यावेळी उपस्थित त्यांना दिली. यावेळी जेष्ठ नेते शिवराम दादा कांबळे,पंचशीलाताई कुंभारकर,ऍड.विशाल साळवे व इतर मान्यवर उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments