प्रतिनिधी-आनंदा भालेराव
नागपूर, दि. 27 फेब्रुवारी 2026 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर)च्या वतीने आज इंदौरा येथील ॲड. सखाराम मेश्राम चौकात दुपारी बारा वाजल्यापासून राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. श्यामदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी “सांगा आम्हाला बिरला-बाटा-टाटा कुठे आहे हो, सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठे आहे हो?” अशा घोषणा देत सरकारचे लक्ष वेधले.
या आंदोलनात SC, ST व VJNT प्रवर्गाच्या जनगणनेनुसार दलित, आदिवासी व वंचित घटकांसाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, वीज, रस्ते व घरकुल यांसारख्या कल्याणकारी योजनांसाठी स्वतंत्र व पुरेसा निधी राखून ठेवावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. संबंधित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात ठोस तरतूद करावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आयु. प्रदीप गायकवाड (राष्ट्रीय संघटक, S.S.D.) तसेच आरपीआय (सेक्युलर) विदर्भ विभागाचे अध्यक्ष दिनेश अंडरसहारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले.
या प्रसंगी कॉ. पी. एन. भेले, रत्नमाला गणवीर, सचिन वरधे, अरुण सहारे, निमिषा डोंगरे, मनोज गजभिये, पुज्य भदंत महाथोरो, संजय आवळे, मंदा गणवीर तसेच विदर्भ विभागातील पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments