प्रतिनिधी-मोहन दिपके
औंढा : औंढा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सिद्धेश्वर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात थोर शास्त्रज्ञ C. V. Raman यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागावी यासाठी इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत पाठ्यपुस्तकावर आधारित विविध प्रश्न विचारण्यात आले.
स्पर्धा Jayant Narlikar गट, A. P. J. Abdul Kalam गट आणि डॉ. सी. व्ही. रमण गट अशा तीन गटांमध्ये पार पडली. चुरशीच्या लढतीत डॉ. जयंत नारळीकर गटाने प्रथम क्रमांक पटकावला. डॉ. एपीजे अब्दुल कलाम गट द्वितीय, तर डॉ. सी. व्ही. रमण गट तृतीय क्रमांकावर राहिला.
विजेत्या विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार हाफीस जहागीरदार यांच्या हस्ते रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे संयोजन व निवेदन राजकुमार मोरगे सर यांनी केले. परीक्षक म्हणून गजानन सांगळे सर व रवींद्र आडे सर यांनी काम पाहिले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उग्रसेन नवले, केंद्रप्रमुख मनोहर पोले, पत्रकार हाफीस जहागीरदार, ढाले महाराज, रणजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा आणि आवड निर्माण झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.


Post a Comment
0 Comments