Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

वसई: वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल ट्रान्सपोर्ट रिक्षा युनियनचा फलक अनावरण सोहळा उस्ताहात

 प्रतिनिधी -शंकर गायकवाड 

वसई : वसई येथील रिक्षा चालकांच्या न्याय्य हक्कासाठी आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी 'वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल ट्रान्सपोर्ट रिक्षा युनियन' च्या नवीन फलकाचे अनावरण रविवारी (दि. १५) वसई स्टेशन येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी संघटनेच्या नवीन कमिटीची घोषणा करण्यात आली असून अध्यक्षपदी बबन कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुरेश मोहिते, प्रदेश संघटक सुनील लोखंडे आणि ठाणे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ तायडे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. यावेळी पालघर जिल्हा प्रभारी सुप्रेश खैरे, शैलेश पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र कोषाध्यक्ष विद्याधन सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने आणि क्षेत्र उपाध्यक्ष अक्षय गुजर यांच्या सहकार्याने या संघटनेची बांधणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी उपस्थित रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, रिक्षा चालकांच्या कष्टाला सन्मान मिळवून देणे आणि त्यांच्या अडचणींच्या काळात संघटना खंबीरपणे पाठीशी उभी राहील.


या कार्यक्रमाला वसई-विरारचे विविध पदाधिकारी उपस्थित होते, त्यामध्ये

संजय पवार (क्षेत्राध्यक्ष, व.वि.म.न.पा),

रणजीत सोनवणे (वसई तालुका अध्यक्ष), भरत मोरे (तालुका उपाध्यक्ष),

बुद्धभूषण सावळे (वसई शहर उमेदवार),

प्रेरणा भेकरे (क्षेत्र उपाध्यक्ष), विठ्ठल गायकवाड व अविनाश रंधवे, तसेच मिरा-भाईंदरमधून सचिन तायडे (कार्याध्यक्ष, भाईंदर प.), अनवर खान, दीपक लाहाने, गुड्डू, आनंद, अमोल घोंगडे आणि अमर मस्के या समाजसेवकांनीही उपस्थिती लावून पाठिंबा दर्शविला.



Tags

Post a Comment

0 Comments