ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन, मुंबई मंडळ यांच्या प्रयत्नांमुळे सेवानिवृत्त कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रतिनिधी -आनंदा भालेराव
दिनांक 16/02/2026 रोजी काॅ. प्रल्हाद खंदारे (वय 76 वर्षे), सिनियर कॅबिन मॅन तथा मुख्य यार्ड प्रबंधक, कल्याण (सेवानिवृत्त) आणि कसारा शाखेचे अध्यक्ष यांच्या कम्युनिटी पेन्शनमधील रु. 2758 कपात बंद करण्यात आली.
नियमांनुसार कम्युनिटी पेन्शन सेवानिवृत्तीनंतर पंधरा वर्षांपर्यंत कपात होत असते. पंधरा वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम मूळ फॅमिली पेन्शनमध्ये समाविष्ट केली जाते. संबंधित मुदत पूर्ण झाल्याने ही कपात थांबवून रक्कम फॅमिली पेन्शनमध्ये जोडण्यात आली आहे.
तसेच, यापूर्वी फॅमिली पास मुख्यालय यार्ड प्रबंधक, कल्याण येथे मिळत होता, तो आता राहत्या ठिकाणाजवळ उपलब्ध व्हावा यासाठी स्टेशन प्रबंधक, टिटवाळा यांना विनंती करून फॅमिली पास टिटवाळा स्टेशन येथे मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे संबंधितांना प्रवासासाठी मोठी सोय झाली आहे.
ही कामे करत असताना मुख्यालय व मुंबई मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. कसारा शाखेच्या वतीने
काॅ. दिलीप वेंखडे (सेक्रेटरी)
काॅ. दिलीप शिंदे (ऑर्गनाइज सेक्रेटरी)
काॅ. आशोक सोनावणे (खजिनदार)
यांचे सहकार्य लाभले.
रेल्वे सेवानिवृत्त कामगारांच्या हक्कासाठी फेडरेशनचे कार्य उल्लेखनीय असून भविष्यातही अशा प्रकारे कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले.


Post a Comment
0 Comments