किन्हवली( शंकर गायकवाड )
किन्हवली परिसरातील पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून उद्योजक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले बाळा शेठ हरी पवार यांचे छोटे बंधू कै. विलास हरी पवार (वय ४०) यांचे दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कै. विलास पवार हे शांत, संयमी व मनमिळावू स्वभावामुळे सर्वांच्या परिचयाचे होते. सामाजिक कार्यक्रम, धार्मिक उपक्रम तसेच गावातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या निधनामुळे समाजातील एक जिव्हाळ्याचा व कर्तृत्ववान व्यक्ती हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री क्षेत्र गोरक्षनाथ मठ, चेरवली येथे दशक्रिया विधी संपन्न होणार असून शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी गुरुकुलनगर, किन्हवली येथील प्रतीक्षा बंगल्यात उत्तरकार्य विधी आयोजित करण्यात आले आहेत.
कुटुंबियांच्या वतीने नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]() |
🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली 🕯️ वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज |


Post a Comment
0 Comments