धसई (ता. शहापुर), प्रतिनिधी -आनंदा भालेराव
“एक गाव एक शिवजयंती” या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धसई येथे आयोजित करण्यात आलेल्या धमाल खुल्या नृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वेहलोळी (बौद्धपाडा) येथील चिमुकल्या बालकलाकारांनी आपल्या उत्कृष्ट नृत्यकलेचा आविष्कार सादर करत प्रथम क्रमांकावर झेंडा फडकवला.
स्पर्धेत ताल, लय आणि सादरीकरणाचा उत्कृष्ट संगम घडवत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या दमदार आणि आकर्षक सादरीकरणामुळे परीक्षकांनी प्रथम क्रमांक जाहीर केला. विजेत्या बालकलाकारांना सुंदर चषक, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ तसेच रुपये ८१०१/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
या यशामुळे जिल्हा परिषद शाळा वेहलोळी (बौद्धपाडा) शाळेचे नाव परिसरात उजळले असून, वेहलोळी गावासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामागे शाळेतील गुरुवर्य आदरणीय जाधव सर, वाघचौरे सर व इतर मान्यवर शिक्षकांची मेहनत आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देत उत्कृष्ट सादरीकरणासाठी घडवले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.
🏆🏆🏆

Post a Comment
0 Comments