प्रतिनिधी : आनंद भालेराव
जिल्हा परिषद शाळा बौद्धपाडा, केंद्र – खातिवली येथील विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत पुन्हा एकदा यशाची परंपरा कायम राखली आहे. “जिद्द + मेहनत = ध्येयपूर्ती” या सूत्राच्या बळावर येथील विद्यार्थी कुमार शौर्य तुकाराम देठे यांची जवाहर नवोदय विद्यालय पालघर येथे प्रवेशासाठी निवड झाली आहे.
या छोट्याशा शाळेची गुणवत्ता व उपक्रमशीलता पाहून वासिंदसारख्या जवळच्या शहरातूनही अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत. शाळेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :
➡️ शाळेत सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते.
➡️ महाराष्ट्र शासन च्या धोरणानुसार सीबीएससी दर्जाचे शिक्षण दिले जाते.
➡️ प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासावर वैयक्तिक लक्ष दिले जाते.
➡️ सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त अभ्यासवर्ग घेऊन विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला जातो.
➡️ नवोदय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, एकलव्य स्कूल प्रवेश परीक्षा, भारत टॅलेंट सर्च परीक्षा अशा स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन केले जाते. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शाळेचे विद्यार्थी दरवर्षी मेरिटमध्ये स्थान मिळवत आहेत.
➡️ वक्तृत्व, समूहगीत, लोकनृत्य, बालनाट्य व लेझीम स्पर्धांमध्येही उल्लेखनीय यश मिळवण्याची परंपरा कायम आहे.
➡️ विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजवण्यावर विशेष भर दिला जातो.
शाळेच्या या सातत्यपूर्ण यशामागे पालकांचे सहकार्य, विद्यार्थ्यांची मेहनत तसेच गटशिक्षणाधिकारी मा. हिराजी वेखंडे, शिक्षण विस्तार अधिकारी मा. रामचंद्र विशे आणि केंद्रप्रमुख मा. प्रतीभा गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Post a Comment
0 Comments