Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

आर.पी.आय. सेक्युलर मुरबाड तालुका आढावा बैठक उत्साहात संपन्न

प्रतिनिधी : आनंदा भालेराव

मुरबाड : दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता ठाणे जिल्हा अध्यक्ष आयु. रविंद्र चंदने यांच्या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आर.पी.आय. सेक्युलर मुरबाड तालुक्याची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान ठाणे जिल्हा सचिव आयु. ॲड. सुजात जाधव यांनी भूषविले.


या बैठकीस मुरबाड तालुका व मुरबाड शहरातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः सदस्य नोंदणी वाढविणे, पक्षसंघटना अधिक मजबूत करणे तसेच गावागावांत नवीन शाखा स्थापन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


यावेळी पक्षाची सामाजिक विचारधारा व उद्दिष्टे याबाबत पदाधिकाऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच आगामी काळात पक्ष बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.


बैठकीस आयु. निखिलजी आहिरे, राजेश गायकवाड यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी “जय भीम, जय संविधान”च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले आणि आढावा बैठकीचा समारोप करण्यात आला.


Post a Comment

0 Comments