कल्याण : मध्य रेल्वेच्या कमर्शियल विभागाची झोनल कॉन्फरन्स मंगळवार (दि. २४ मार्च २०२६) रोजी कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंच येथे राष्ट्रीय रेल्वे मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाचे प्रभावी नेतृत्व कॉम. वेणु पी. नायर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात कल्याण पार्सल ऑफिस येथून भव्य रॅलीने झाली. रॅलीपूर्वी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्ग व बाजारपेठेतून निघालेल्या या रॅलीचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
कल्याण स्टेशनपासून आचार्य अत्रे रंगमंचापर्यंत लाल झेंडे आणि घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. रॅलीदरम्यान महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून त्यांच्या विचारांना नमन करण्यात आले.
आचार्य अत्रे रंगमंच येथे झालेल्या सभेला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे संचालन करताना कॉम. वेणु पी. नायर यांनी कमर्शियल विभागातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर भाष्य केले तसेच कामगारांच्या हक्कांसाठी युनियनची भूमिका ठामपणे मांडली.
यावेळी विविध वक्त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत आपले विचार मांडले. तसेच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रस्तावही मंजूर करण्यात आले.
ऊर्जा, एकजूट आणि संघर्षाचा निर्धार व्यक्त करत ही झोनल कॉन्फरन्स ऐतिहासिकरीत्या यशस्वी ठरली.


Post a Comment
0 Comments