प्रतिनिधी-शंकर गायकवाड
शहापूर, दि. 19 मार्च 2026 : सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा, ठाणे जिल्हा अंतर्गत शहापूर तालुका शाखेचे पुनर्गठन उत्साहात पार पडले. कार्यक्रमास राष्ट्रीय सचिव गायकवाड गुरुजी, आयुष्यमान राजेश पवार, ठाणे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, जिल्हा सरचिटणीस छगन सुरवाडे, कार्यालयीन सचिव प्रशांत गांगुर्डे, संस्कार सचिव कांतीलाल भडांगे, जिल्हा हिशोब तपासणीस संजय भालेराव, जिल्हा संघटक करुणा भडांगे, संरक्षण उपाध्यक्ष हिरामण पगारे तसेच माजी तालुका अध्यक्ष दीपेश कांबळे व माजी सरचिटणीस विजय भोईर उपस्थित होते.
यावेळी बी.एच. गायकवाड यांनी बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, समता सैनिक दलाचे पदाधिकारी व धम्मबांधवांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड व राष्ट्रीय सचिव राजेश पवार यांनी संघटनात्मक बळकटीसंदर्भात मार्गदर्शन केले.
चर्चेनंतर शहापूर तालुका कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले असून अध्यक्षपदी मारुती चन्ने, सरचिटणीसपदी प्रभाकर थोरात, कोषाध्यक्षपदी मनोज रामचंद्र गायकवाड यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी अनिल तायडे, मगन गवडे, सुरेश घनबाव, हिशोब तपासणीस राहुल ढोडरे, कार्यालय सचिव सुधीर जावळे यांच्यासह सचिवपदी मनोज साळवे, महेश भोईर, अमित चन्ने, निखिल धनकर, सुनील भवार यांची निवड झाली. संघटक म्हणून प्रवीण सोनवणे, हेमंत वाकचौरे व अमर मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, जिल्हा सरचिटणीस छगन सुरवाडे व जिल्हा कोषाध्यक्ष बापू ढोडरे यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments