Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त महिला हक्कांवर जागृती कार्यक्रम संपन्न.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : आनंद भालेराव

नागपूर : आरपीआय सेक्युलर महिला फ्रंट, नागपूर यांच्या वतीने आज दिनांक ११ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजता बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे स्मृती परिसर, इंदोरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त “भारतीय संविधानामध्ये आज महिलांची काय स्थिती आहे?” या विषयावर जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम आयु. रत्नमाला गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.


कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन नेते स्मृतिशेष प्रा. रणजीत मेश्राम यांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमात डॉ. अर्चना सुखदेवे, सुरेखा जांभुळकर, मंदा गणवीर यांनी मार्गदर्शन केले. तसेच गोल्डन इरा ग्रुपच्या वतीने संविधान जनजागृतीवर आधारित छोटे नाट्य सादर करण्यात आले. आयु. छाया बेहेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या या नाटिकेमुळे उपस्थित महिलांचे प्रबोधन करण्यात आले.


कार्यक्रमास दिपिका गजभिसे, सुशिला खांडेकर, वंदना चोखांद्रे, जिजाबाई खंडारे यांच्यासह परिसरातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


कार्यक्रमाचे संचालन निमिषा डोंगरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयु. रत्नमाला गणवीर यांनी केले.



Post a Comment

0 Comments