Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

नागपुरात २३ मार्च रोजी आरएसएस कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे धरना आंदोलन.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

कार्यकारी संपादक : रितेश साबळे

नागपूर : केंद्र सरकारने अचानकपणे देशभरात ESMA (Essential Services Maintenance Act) लागू केल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आरएसएस-भाजपाच्या राजकारणामुळे देशातील परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होत असून त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होत आहे.


ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, भारताने इराणसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले असते तर चीनप्रमाणे भारतालाही इराणकडून गॅस व तेल मिळू शकले असते. मात्र सध्याच्या धोरणांमुळे भारत विविध स्तरांवर आंतरराष्ट्रीय दबावाला सामोरे जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पुढील काळात बँकिंग प्रणालीवरही परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.


सरकारच्या धोरणांमुळे देशातील सामान्य नागरिकांना आर्थिक आणि सामाजिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी २३ मार्च रोजी नागपूर येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीबरोबरच काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी होणार आहेत. नागपूर येथील आरएसएस कार्यालयाजवळ धरना आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.


तसेच या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी सर्व नागरिकांना केले आहे.




Post a Comment

0 Comments