Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

🪔 गुढीपाडव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम 🪔



प्रतिनिधी-गणेश आहिरे 

शहापूर : मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर १० वी (क) सन १९९६/९७ च्या माजी विद्यार्थ्यांनी एक आदर्श सामाजिक उपक्रम राबवत जुन्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.

“सरस्वती शाळेतील मित्रांची आठवण” या भावनिक संकल्पनेतून दिवंगत मित्र कै. विश्वनाथ गवाळे, कै. नामदेव दोंदे (भावश्या) आणि कै. प्रकाश निकाळे यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद अंगणवाडी, सिद्धार्थ नगर येथील विद्यार्थ्यांना वह्या, शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमावेळी शिक्षिका भारती अनिल मोरे (मॅडम) व मदतनीस  सविता नामदेव दोंदे यांची उपस्थिती लाभली. तसेच शाळेतील विद्यार्थी, पालक आणि १० वी (क) १९९६/९७ बॅचचे सर्व सदस्य यांच्या सहभागामुळे कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला.


माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या उपक्रमामुळे गुढीपाडव्याचा सण अधिक अर्थपूर्ण ठरला. मैत्री, स्मरण आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला.


कार्यक्रमात सहभागी माजी विद्यार्थी:

शैलेश आंबवणे, विजय पवार, विजय भेरे, हनुमंत टोले, मुनींद्र दिवेकर, सतीश गायकर, रवींद्र गोतरणे, विलास मोरे, रेश्मा शेलार (काळमेघ), संगीता जाधव, प्रवीण पाटील, सुनील शेलार, शकुंतला शेलार, अर्चना गवई, गणेश भोई, कांतीलाल गंगे, भारती वेखंडे, पूनम सासे, दिनेश भेरे, भरत शेलार, प्रमिला कोलेकर.


🙏📚 “सण आनंदाचा… आणि समाजासाठी काहीतरी करण्याचा!” 📚🙏



Post a Comment

0 Comments