Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

सेवानिवृत्त रेल्वे कामगारांना दिलासा; कम्युनिटी पेंशन मिळवून देण्यात यश.

प्रतिनिधी : आनंद भालेराव

ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन, मुंबई मंडळ व कसारा शाखेच्या पुढाकारातून सेवानिवृत्त रेल्वे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिनांक 02 फेब्रुवारी 2026 रोजी श्री. यशवंत लायरे (सेवानिवृत्त, परेल वर्कशॉप) यांना सेवानिवृत्तीला 28 फेब्रुवारी 2011 पासून 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कम्युनिटी पेंशन रुपये 3910 मंजूर करून देण्यात आले.


यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, टिटवाला शाखा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे आवश्यक अर्ज भरून जमा करण्यात आला होता. संबंधित प्रक्रियेचा पाठपुरावा करून लायरे यांना कम्युनिटी पेंशन मिळवून देण्यात फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


या कार्यासाठी कसारा शाखेचे अध्यक्ष कॉ. प्रल्हाद खंदारे, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कॉ. दिलीप शिंदे, सदस्य उत्तम गाडे तसेच मुंबई मंडळाचे अध्यक्ष कॉ. जे. एन. पाटील आणि ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कॉ. वसंत कासार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


कामावर असताना तसेच सेवानिवृत्तीनंतरही कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेली एनआरएमयू (NRMU) ही संघटना असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. संघटनेचे महामंत्री कॉ. वेणु पी. नायर यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या विविध प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली जात आहे.



Post a Comment

0 Comments