प्रतिनिधी:- शंकर गायकवाड
शहापूर : दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी भारतीय जनगणना 2026 अंतर्गत घरयादी व गटयादी करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर प्रगणक, पर्यवेक्षक व प्रशिक्षक यांच्या नियुक्ती प्रक्रियेसंदर्भात शहापूर तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात कार्यरत बी.एल.ओ. शिक्षक, दुर्धर आजाराने ग्रस्त शिक्षक, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले शिक्षक, दिव्यांग शिक्षक तसेच महिला शिक्षिका यांना या कामकाजातून वगळण्याची मुख्य मागणी करण्यात आली. या संदर्भात माननीय तहसीलदार श्री. परमेश्वर कासुळे यांच्याशी चर्चा देखील करण्यात आली.
समन्वय समितीच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कार्यरत बी.एल.ओ., दिव्यांग शिक्षक तसेच दुर्धर आजारी शिक्षक यांना या कामातून वगळण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार कासुळे यांनी दिल्याची माहिती समितीकडून देण्यात आली.
यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष नितीन तारमळे, सचिव मनोज गांधळी, कार्याध्यक्ष विश्वास परटोले व सतीश भोईर उपस्थित होते.
शहापूर तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष नितीन तारमळे, सचिव मनोज गोंधळी, कार्याध्यक्ष विश्वास परटोले, उपाध्यक्ष भरत पांढरे, रविंद्र पालवे, कोषाध्यक्ष अंकुश माळी, सहकार्याध्यक्ष नामदेव बांगर, सहसचिव प्रवीण वेखंडे, समन्वयक खंडू पारधी, प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय पाटील, कार्यालयीन चिटणीस योगेश ठाकरे तसेच समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments