Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

डोंबिवलीत २२ वर्षीय महिलेवर अत्याचार; तिघे रिक्षाचालक अटकेत.

 


प्रतिनिधी-मनोहर गायकवाड 

डोंबिवली : सांस्कृतिक ओळखीमुळे प्रसिद्ध असलेल्या डोंबिवली शहरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २२ वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा रिक्षाचालकांना अटक केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळ सोलापूर येथील रहिवासी असून ती डोंबिवली येथे एका सुरक्षा रक्षक एजन्सीत काम करत होती. तिच्या ओळखीतील काही रिक्षाचालक मित्रांनी तिला पार्टीच्या बहाण्याने खंबाळपाडा परिसरातील एका घरात नेले. तेथे पार्टीदरम्यान मुख्य आरोपीने तिच्यावर शिवीगाळ करत मारहाण केली व तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.


घटनेनंतर पीडित महिलेने टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.


या प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने जलद कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली. उमेश वर्मा, चेतन चव्हाण आणि हेमंत चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते सर्व डोंबिवली परिसरात रिक्षाचालक म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये उमेश वर्मा हा मुख्य आरोपी असल्याचेही समोर आले आहे.


दरम्यान, या घटनेमुळे डोंबिवली परिसरात संतापाची लाट पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



Post a Comment

0 Comments