Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

गॅस टंचाईविरोधात ठाण्यात ‘चूल पेटवा’ आंदोलन

 


प्रतिनिधी - शंकर गायकवाड 

ठाणे : राज्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईचा प्रश्न तीव्र होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाणे, नवी मुंबई आणि उल्हासनगर परिसरात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. “नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर?” या घोषणेसह आंदोलनकर्त्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी दीर्घ रांगा लावाव्या लागत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने तातडीने या समस्येवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी गॅस पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, असेही सांगितले.


आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पारंपरिक चुलीवर भाकर बनवून प्रतीकात्मक आंदोलन केले. तयार केलेले अन्न जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनासह देत सरकारपर्यंत नागरिकांच्या अडचणी पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.


या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असून, गॅस टंचाईच्या प्रश्नावर सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

Post a Comment

0 Comments