प्रतिनिधी : आनंद भालेराव
ठाणे, दि. 04 एप्रिल 2026 :
“UGC कायदा लागू करा”, “रोहित वेमुला कायदा झाला पाहिजे”, “जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे”, “नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या”, “नवे मनुवादी शिक्षण धोरण रद्द करा”, “आस्थापनातील कंत्राटी पद्धत बंद करा” आदी विविध मागण्यांसाठी आज ठाणे कलेक्टर कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला.
सामाजिक समता आंदोलन समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात शैक्षणिक संस्थांमधील जातीय भेदभावाच्या विरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रीय OBC महासंघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर), आदिवासी एकता समाज, आगरी समाज संघटना, विविध विद्यार्थी संघटना, लाल बावटा मार्क्सवादी तसेच तळागाळातील इतर संघटनांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
आंदोलनादरम्यान विविध नेत्यांनी आपल्या भाषणातून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत, सामाजिक न्यायासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली. आंदोलनात वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.
या निदर्शनात शहापूर तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) पक्षाचे ठाणे जिल्हा सहसचिव प्रविणजी केदारे, जिल्हा संघटक फिरोजभाई शेख, तालुका महासचिव जोसेफ डिसोझा, महिला विभाग अध्यक्ष ॲड. वंदना भागवत, तालुका सरचिटणीस सविता पंडित, तालुका उपाध्यक्ष राहुल दिवेकर, संतोष गायकवाड, युवक अध्यक्ष विकास वाढविंदे, वासिंद विभागीय सचिव ॲड. विजय लोंढे, उपाध्यक्ष सचिन खरे व संकेत राणे आदी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) चे ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदने तसेच महाराष्ट्र राज्य सरचिटणीस किरण चन्ने यांनी आंदोलनकर्त्यांचे कौतुक करत सर्वांना शाबासकी दिली.

Post a Comment
0 Comments