Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त बौद्धाचार्य-श्रामणेर शिबिराचे आयोजन; तुर्भे येथे फळदान उपक्रम संपन्न.

 


प्रतिनिधी -शंकर गायकवाड 

नवी मुंबई : भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब अर्थात ॲड. प्रकाश यशवंतराव आंबेडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रविवार दि. १० मे २०२६ ते १९ मे २०२६ या कालावधीत बौद्धाचार्य – श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


धम्म, संस्कार आणि बौद्ध विचारांची जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला कार्यकर्ते व बौद्ध बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

याच पार्श्वभूमीवर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १० मे रोजी तुर्भे स्टोअर येथील पंचशील बुद्ध विहार येथे फळदानाचा उपक्रम राबविण्यात आला.


या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष आयु. अश्वजीत जगताप, महिला अध्यक्षा आयु. शिल्पा रणदिवे तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी समाजहिताचे उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.


कार्यक्रमास नवी मुंबई जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments