Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड शासकीय रुग्णालयात फळवाटप.



प्रतिनिधी : आनंदा भालेराव

मुरबाड : वंचित बहुजन आघाडी मुरबाड तालुक्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, समाजाचे प्रेरणास्थान तसेच वंचितांचे कैवारी आदरणीय Prakash Ambedkar यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.


या कार्यक्रमात आरपीआय सेक्युलर ठाणे जिल्हाध्यक्ष आयु. रविंद्र चंदने यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. कोणत्याही प्रकारचा पक्षीय भेदभाव न ठेवता समाजात एकतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचे कार्य त्यांनी केले. अन्यायाविरोधात सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.


हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी मुरबाड तालुकाध्यक्ष आयु. गुरुनाथ पवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास तालुक्यातील राजकीय, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


तालुक्यातील होतकरू तरुण, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणण्याचे उल्लेखनीय कार्य आयु. रविंद्र चंदने करीत असून, त्यांच्या या कार्याबद्दल उपस्थितांनी त्यांचा सन्मान करून क्रांतिकारी जयभीमच्या घोषणा दिल्या.



Post a Comment

0 Comments