Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान प्रकरणावर नागपुरात तीव्र निषेध आंदोलन.

 


प्रतिनिधी : आनंद भालेराव

नागपूर, दिनांक 29 एप्रिल 2026 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथित अपमानाच्या निषेधार्थ नागपूरमध्ये वातावरण तापले असून, कुनबी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले.


मिळालेल्या माहितीनुसार, एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कार्यक्रमास राज्याचे माननीय मुख्यमंत्री तसेच संघ प्रमुख उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर नागपूरमधील विविध सामाजिक संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

कुनबी सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये निषेध आंदोलन करत धीरेंद्र शास्त्री यांच्या बॅनरला चपला मारून तसेच बॅनर जाळून आपला रोष व्यक्त केला. "महापुरुषांचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही", "धीरेंद्र शास्त्रींवर तात्काळ गुन्हा दाखल करा" अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.


या आंदोलनादरम्यान, "मुख्यमंत्री आणि संघ प्रमुख या प्रकरणात गप्प का?" असा सवाल उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. संबंधितांवर तात्काळ FIR नोंदवावी, अन्यथा महाराष्ट्र बंदचा इशारा देण्यात आला.

या निषेध कार्यक्रमास सुरेश वर्षे, सुनिल केदार, दिनेश अंडरसहारे, हरीश देशमुख, राजेश काकडे, अल्का धवळ, अतुल गुढधे, बाळा शिंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.


"छत्रपती शिवाजी महाराज विजय असो", "जय भीम", "जय महाराष्ट्र", "जय संविधान" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शांततेत आंदोलनाची सांगता करण्यात आली.


Post a Comment

0 Comments