Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

डोळखांब विभागातील अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्या; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे तहसीलदारांना निवेदन.

 


शहापूर | शंकर गायकवाड 

शहापूर तालुक्यातील डोळखांब विभागात झालेल्या ढगफुटी सदृश अतिवृष्टीमुळे भातशेतीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच डोळखांब गावात अचानक पाणी शिरल्याने अनेक घरे व व्यावसायिक दुकानांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकरी व बाधित नागरिकांना शासनाकडून त्वरित नुकसानभरपाई जाहीर करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहापूर तालुक्याच्या वतीने आज मा. तहसीलदार, शहापूर यांना निवेदन देण्यात आले.


तालुकाप्रमुख कुलदीप धानके यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख, तालुका विस्तारक गणेश अवसरे, शहापूर शहरप्रमुख विजय देशमुख, दिलीप कुडव, गणेश फर्डे, हेमंत मोरे आणि हेमंत तावडे उपस्थित होते.


यावेळी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

Post a Comment

0 Comments