Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

मुरबाड येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आषाढ पौर्णिमा वर्षवास मालिकेचा शुभारंभ उत्साहात.

मुरबाड | प्रतिनिधी-आनंदा भालेराव 

भारतीय बौद्ध महासभा, शाखा मुरबाड तालुका पुरुष व महिला कार्यकारिणीच्या वतीने बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी आषाढ पौर्णिमा निमित्त वर्षवास प्रबोधन मालिकेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्कार उपाध्यक्ष विजय खोळंबे गुरुजी यांनी भूषविले. यावेळी ज्येष्ठ बौद्धाचार्य आदरणीय पुंडलिक (बाबा) चंदने यांनी "आषाढ पौर्णिमा वर्षवास" या विषयावर सखोल प्रबोधन करत प्रबोधन मालिकेचे पहिले पुष्प अर्पण केले. त्यांच्या मार्गदर्शनातून उपस्थित उपासक-उपासिकांना बौद्ध धम्मातील वर्षवास परंपरेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

कार्यक्रमास भगवान देसले, भाऊ खोळंबे, नागेश थोरात, सुभाष जाधव, नामदेव गायकवाड, ज्योतीताई अहिरे, योगीताताई खंडागळे, सविताताई भोईर, साधनाताई धनगर तसेच शाखेचे पदाधिकारी, उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सर्वांना शुभेच्छा देत वर्षवास प्रबोधन मालिकेस शुभारंभ केला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे सरचिटणीस भगवान देसले गुरुजी यांनी केले, तर ज्योतीताई अहिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments