सहसंपादक - शंकर गायकवाड
हेदवली : सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ, हेदवली यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ तसेच लहान मुलांसाठी संगीत खुर्ची व फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील महिला, लहान मुले तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात गावातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विविध मनोरंजक खेळ व प्रश्नमंजुषेत महिलांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमाची रंगत वाढवली. यामध्ये मनीषा शैलेश फर्डे, अर्चना शिवाजी फर्डे आणि हर्षदा संजय देसले या होम मिनिस्टर ठरल्या. तसेच ज्योती ज्ञानेश्वर लोखंडे, नम्रता निलेश फर्डे, माया लक्ष्मण फर्डे आणि साधना नरेश गोडांबे यांनीही विजेतेपद मिळवले.
यावेळी लकी ड्रॉमध्ये सिंधू एकनाथ फर्डे यांनी बाजी मारली. लहान मुलांसाठी आयोजित संगीत खुर्ची व फॅन्सी ड्रेस स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन दत्तात्रय फर्डे सर आणि रविंद्र मारुती फर्डे यांनी केले. त्यांच्या उत्स्फूर्त आणि मनोरंजक सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
गावातील सर्व महिला व नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सहभाग नोंदविला. सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि आनंदात संपन्न झाला.


Post a Comment
0 Comments