प्रतिनिधी - आनंदा भालेराव
मुंबई : ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेअर फेडरेशनच्या मुख्यालय कमिटीने मध्य रेल्वे व कोकण रेल्वेचे महामंत्री कॉ. वेणु पी. नायर यांच्या आदेशानुसार संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेत सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली.
यावेळी C.P.O. (IR), P.M.C.D. मुख्य वैद्यकीय अधिकारी तसेच Senior Personnel Officer (SR.D.P.O.) यांची भेट घेण्यात आली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कॉम्प्लिमेंटरी मॅन्युअल पास उपलब्ध करून देणे तसेच पेण, रोहा आणि कासू परिसरातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी विशेष चर्चा करण्यात आली.
पेण येथील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसंदर्भात फेडरेशनच्या लेटरपॅडवर लेखी निवेदनही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
“जोपर्यंत सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील,” अशी भूमिका फेडरेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
या भेटीदरम्यान मुख्यालयाकडून कॉ. व्ही. आनंदन – महामंत्री, कॉ. रसिक मलबारी – ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, कॉ. विलास भोसले – खजिनदार तसेच नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे मुख्यालय खजिनदार कॉ. संदीप जाधव उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments