Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राष्ट्रीय स्तरावर संघटन मजबूत करण्याचा निर्धार.

नवी मुंबई : प्रतिनिधी – गुरुनाथ लोखंडे

नवी मुंबईतील सीवूड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे महाबोधी महाविहार लिबरेशन कौन्सिल ऑफ इंडिया (M.L.C.) यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. दि. १९ व २० सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या परिषदेत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राष्ट्रीय स्तरावर संघटनात्मक बांधणी, Charter of Demands तसेच आगामी आंदोलनाची दिशा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनासाठी केंद्रीय कायदा करावा, बोधगया मंदिर कायदा रद्द करावा तसेच महाविहाराचे संरक्षण व व्यवस्थापन भारतीय बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी पुढील काळात संघर्ष अधिक व्यापक करण्याचा निर्धार परिषदेत व्यक्त करण्यात आला.


महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठीचा लढा संवैधानिक आणि लोकशाही मार्गाने अधिक व्यापक करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संघटन मजबूत करण्याची आवश्यकता यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.


या राष्ट्रीय परिषदेला गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश यांसह विविध राज्यांतील धार्मिक व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषदेत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या आगामी रणनीतीवरही चर्चा करण्यात आली.

Post a Comment

0 Comments