उल्हासनगर :
उल्हासनगर ते कल्याणदरम्यान धावत्या लोकलवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना आज घडली. या दगडफेकीत एका प्रवाशाच्या कपाळाला दगड लागून दुखापत झाली आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रेल्वे पटरीच्या बाजूला उभे राहून लोकल येताच तिच्यावर दगडफेक करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याची प्रवाशांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अशा दगडफेकीमुळे खिडकीजवळ बसलेल्या प्रवाशांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता असून, काही वेळा जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो.
रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) या प्रकारांची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. रेल्वे मार्गालगत संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवावी, सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयितांवर लक्ष ठेवावे आणि दगडफेक करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्यांना वेळीच आळा बसणार का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Post a Comment
0 Comments