वृत्त रत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
उंभरई (ता. शहापूर) |
जिल्हा परिषद मराठी शाळा, उंभरई येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी समग्रशिक्षा योजनेअंतर्गत शालेय गणवेश वाटप कार्यक्रम आज उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन गणवेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकवर्ग तसेच ग्रामस्तरावरील विविध मान्यवर उपस्थित होते.
विशेष उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा आयु. विशाखा विकास वाढविंदे यांनी स्वतः विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करत सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव दाखवली. तसेच सम्राट महिला बचत गटाच्या अध्यक्षा यांच्या हस्ते देखील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. उपाध्यक्षा आयु. विशाखा वाढविंदे यांनी आपल्या भाषणात समग्रशिक्षा योजनेमुळे ग्रामीण भागातील शिक्षण अधिक सक्षम होत असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक व शिक्षकवर्गाने केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि शाळेबद्दल आकर्षण निर्माण झाले असून शाळेतील सकारात्मक वातावरण दिसून आले.



Post a Comment
0 Comments