Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

कल्याण-शिळफाटा मार्गावर 11 ते 31 ऑगस्टदरम्यान रात्री वाहतुकीत बदल; कोणते मार्ग बंद, कोणते पर्यायी?

 



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज! संपादकीय 

कल्याण : एमएमआरडीएच्या मेट्रो 12 (कल्याण-तळोजा) प्रकल्पांतर्गत सिमेंट गर्डर बसवण्याचे काम सुरू असल्याने कल्याण-शिळफाटा मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. ठाणे शहरातील कोळसेवाडी वाहतूक उपविभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हे बदल 11 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान रात्री 11:45 ते पहाटे 5:00 या वेळेत लागू राहतील. पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशानुसार हे बदल दोन टप्प्यांत राबवले जाणार आहेत.


पहिला टप्पा : 11 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट


मानपाडा चौक प्रवेश बंद


बंद मार्ग: कल्याण-शिळरोडवरून कल्याणकडे येणाऱ्या वाहनांना मानपाडा चौकातून प्रवेश नाही.


पर्यायी मार्ग: सर्व्हिस रोडने सोनारपाडा चौक, तेथून पुन्हा मुख्य रस्ता.


सुयोग रीजन्सी अनंतम चौक प्रवेश बंद


बंद मार्ग: कल्याण-शिळरोडवरून शिळफाट्याकडे जाणारी वाहने.


पर्यायी मार्ग: पीलर 110 वरून उजवीकडे, कल्याणकडे येणाऱ्या वाहिनीने पीलर 128 समोरून डावीकडे.



डी.एन.एस. चौक प्रवेश बंद


बंद मार्ग: कल्याण-शिळरोडवरून कल्याणकडे येणारी सर्व वाहने.


पर्यायी मार्ग: डी.एन.एस. चौक पीलर 144 वरून सर्व्हिस रोड, सुयोग हॉटेल अनंतम चौक, तेथून कल्याण रोड.


हे बदल रात्रीच्या वेळेत असल्याने सर्वसामान्यांना फारशी गैरसोय होणार नाही. मात्र, पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना यामधून सूट देण्यात आली आहे.



Post a Comment

0 Comments