Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

खामगावातील ‘गाय चोर’ प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित पगारिया अमडापूर पोलिसांच्या ताब्यात


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

रितेश साबळे 

बुलढाणा (खामगाव) – खामगाव शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या आणि राज्यभर चर्चेत आलेल्या कथित ‘गाय चोर’ प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित सुरजमल पगारिया (वय 36, रा. सिव्हिल लाईन, खामगाव) याला अमडापूर पोलिसांनी ११ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे मध्यरात्री अटक केली आहे. त्याच्यावर ॲट्रॉसिटी कायदा, पोस्को कायदा तसेच भारतीय दंड संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे.


 घटनेची पार्श्वभूमी

८ जून २०२५ रोजी पहाटे अंदाजे २:३० वाजता चिखली बायपासवरील एका चहाच्या दुकानासमोर, उदयनगर येथील एका अल्पवयीन मुलगी आणि एका विशिष्ट समाजातील युवक – रोहन संतोष पैठणकर (वय 21) – उभे असताना, रोहित पगारिया व त्याच्या साथीदारांनी मुलगी पळवून आणल्याच्या संशयावरून त्यांना जबर मारहाण केली. या वेळी आरोपींनी पीडित तरुणाला “गाय चोर” म्हणून शिवीगाळ केली, कपडे फाडले आणि अपमानास्पद व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेमुळे दलित समाजासह शहरभर तीव्र संताप पसरला आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांवर दबाव निर्माण झाला.


 गुन्हा नोंद

या प्रकरणी आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्यासह पोस्को कायदा आणि भारतीय दंड संहितेतील गंभीर कलमे लावण्यात आली आहेत.

गुन्हा नोंद: अप. क्र. 170/25

कलमे: 137(2), 96, 64(1), 75(1), 351(2), 353(2) BNS सह कलम 4(1), 8, 12, 23 POCSO, सह कलम 3(1)(w)(i)(ii), 3(2)(va), 3(2)(v), 3(1)(r) अ.जा.जा. प्र. अधिनियम.

या गुन्ह्यात रोहित पगारिया व्यतिरिक्त गज्जू गुजरिवाल आणि प्रशांत संगेल यांची नावेही आरोपी म्हणून नोंदवली आहे.

अटक प्रक्रियेची माहिती

घटनेनंतर पगारिया महिनाभरापासून फरार होता. तीन दिवसांपूर्वीच त्याला खामगाव न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. मात्र, पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर अमडापूर पोलिसांनी नवीन गुन्हा नोंदवून शोध मोहीम सुरू ठेवली.


११ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ३:०१ वाजता आरोपी आपल्या राहत्या घरी परतल्याची माहिती मिळताच, अमडापूर पोलिस स्टेशनचे API निखिल निर्मळ यांनी पथकासह तात्काळ छापा टाकून त्याला अटक केली. अटकेची माहिती त्याचा भाऊ विनम्र सुरजमल पगारिया यांना देण्यात आली.



मुख्य संपादक : सागरजी रोकडे सर

सहसंपादक : संदेशजी भालेराव सर

कार्यकारी संपादक : रितेश साबळे, औरंगाबाद

जाहिरातीसाठी संपर्क : 88 30 70 85 22

Post a Comment

0 Comments