वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
शहापूर (शंकर गायकवाड) :
दिनांक 18 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2025 या कालावधीत शासनाच्या विविध विभागातील वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे पायाभूत प्रशिक्षण शहापूर येथील वन प्रशिक्षण संस्थेत संपन्न झाले.
या प्रशिक्षणाचे आयोजन संस्थेचे संचालक श्री. प्रदीप बुधनवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रशिक्षण सत्रांसाठी मार्गदर्शक म्हणून अजय पाठक व प्रकाश मोहिते यांनी कार्यभार सांभाळला.
या प्रशिक्षणामध्ये शासनाच्या विविध विभागातील एकूण 31 कर्मचारी सहभागी झाले. प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजाची मूलभूत माहिती, कार्यपद्धती, शिस्त, तसेच कर्तव्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


Post a Comment
0 Comments