Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

वाळूज एमआयडीसी परिसरातील उद्योगांना पायाभूत सुविधांची आस.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

रितेश साबळे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसर हा राज्यातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जातो. हजारो कोटींचा व्यवसाय, लाखो रुपयांचा व्यवहार आणि हजारो कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा परिसर आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे चालत असूनही रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची कमतरता आणि विजेच्या खंडित पुरवठ्यामुळे उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.


उद्योग विस्तारामुळे एमआयडीसी हद्दीत जागेची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे सुमारे १,६०० उद्योगांनी खासगी जागांवर आपले कारखाने उभारले आहेत. या उद्योगांतून सुमारे ५० हजार थेट आणि १० हजार अप्रत्यक्ष कामगारांना रोजगार मिळत आहे. प्रेस पार्ट्स, इंजिन पार्ट्स, रबर, प्लॅस्टिक मोल्डिंग यांसारख्या उत्पादनांमध्ये हे उद्योग अग्रेसर आहेत.



तथापि, रस्त्यांवरील खड्डे, वाहतुकीतील अडथळे आणि वारंवार खंडित होणारा विजेचा पुरवठा यामुळे उत्पादनावर परिणाम होत असल्याची चिंता उद्योगपतींनी व्यक्त केली आहे. शासनाने तातडीने लक्ष घालून या परिसरात रस्ते दुरुस्ती, विजेची समस्या आणि पाणीपुरवठा यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.


औद्योगिक क्षेत्रातून सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असताना सुविधांच्या बाबतीत मात्र कायम दुर्लक्ष होत असल्याची नाराजी कामगार व उद्योगपती यांच्यातून व्यक्त केली जात आहे.





Post a Comment

0 Comments