वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
शहापूर (शंकर गायकवाड) :
शहापूर तालुक्यातील साखरपाडा व मुरबाड तालुक्यातील शिरोशी गावाला जोडणारा खाबरीज गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत आहे. या पुलावरून रोज शेकडो नागरिक, शेतकरी व आदिवासी बांधव प्रवास करतात. मात्र, थोडासा जास्त पाऊस झाला की पुलावरून पाणी वाहू लागते. त्यामुळे नागरिकांना तासन्तास पुलाच्या बाजूला थांबावे लागते.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “पाऊस आला की पुलावरून पाणी वाहते, त्यामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. काहीवेळा तर पुल ओलांडावा की नाही, अशी वेळ येते.”
दरवर्षी हीच समस्या उद्भवत असून, अद्याप या पुलाच्या उंचीवाढीबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. त्यामुळे हा ब्रिज उंच करून मजबूत बांधकाम व्हावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी यांच्याकडून केली जात आहे.


Post a Comment
0 Comments