Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

कर्जामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत वाढ; तातडीने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा – प्रा. किसन चव्हाण



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

रितेश साबळे 

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यामागे कर्जबाजारीपण हा प्रमुख मुद्दा असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी सरकारकडे तातडीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे.


प्रा. चव्हाण म्हणाले की, “शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली दबला जात आहे. अपुऱ्या पावसामुळे, हवामानातील अनियमिततेमुळे व उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जागे होऊन तातडीने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकरी आणखी मोठ्या संकटात सापडेल.”


शेतकरी हा देशाचा कणा असून त्याला वाचवण्यासाठी ठोस उपाययोजना करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.




Post a Comment

0 Comments