वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मनोहर गायकवाड
ठाणे : भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका येथील सिराज हॉस्पिटलजवळ रात्री एक वेदनादायक अपघात झाला. डॉक्टर मोहम्मद नसीम अन्सारी त्यांच्या एक्टिव्हा बाईकवरून घरी परतत होते. दरम्यान, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांची स्कूटी घसरली आणि तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका ट्रकच्या मागील टायरने त्यांना चिरडलं. ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय. संतप्त नागरिकांनी रस्ता रोखून गोंधळ घातला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना समजावून जमाव हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली. सकाळी या ठिकाणी स्थानिकांच्या वतीने हे खड्डे बुजवण्यात आले. कंटेनर चालकाविरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका येखील सिराज हॉस्पिटलजवळ काल शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात घडला. ढाब्यावरुन जेवण करुन आपल्या स्कूटीवरुन घरी परतत असताना एका डॉक्टराला आपला जीव गमवावा लागला आहे
मध्यरात्री सिराज हॉस्पिटल समोरील रस्त्यावर त्यांची एक्टिव्हा दुचाकी घसरली आणि मागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून वंजारपट्टी नाका येथील एपीजे अब्दुल कलाम उड्डाण पुलावर खड्डे बुजवण्याचे काम सुरु असल्याने अवजड वाहनांची खालून वाहतूक सुरू होती.
दुचाकी घसरल्यामुळे थेट ट्रकच्या चाकाखाली जाऊन डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांनी अवजड वाहन वाहतूक बंद करण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन केलं. घटनास्थळी पोलीस पोहोचताच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. कंटेनर चालक मोहम्मद बिलाल मोहम्मद अस्लम (वय ३०) याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.


Post a Comment
0 Comments