वृत्त रत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
कार्यकारी संपादक:-रितेश साबळे
जोगेश्वरी एमआयडीसी (औरंगाबाद) – आज दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी जोगेश्वरी एमआयडीसी येथील अमरदीप प्राथमिक शाळेमध्ये पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहात पार पडले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव सौ. दिपालीताई मोटे उपस्थित होत्या.
या प्रसंगी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शालेय, सामाजिक आणि शिस्तीच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ‘दामिनी पथक’ाच्या वतीने उपस्थित पालकांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या बाबतीत मुलींवर लक्ष ठेवणे, त्यांच्यावर विश्वास ठेवून पण सावध राहणे, शिक्षण देतानाच सजगता बाळगणे या बाबींचे भान त्यांनी पालकांना करून दिले.
कार्यक्रमात वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक रितेशजी साबळे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि भावनिक भाषणातून उपस्थित शिक्षक व पालक यांना मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहावे, त्यांना शिकवताना प्रेम, आदर आणि माया यांचा उपयोग कसा करावा याबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच पालकांना आवाहन केले की, आपण आपल्या पाल्यावर जबरदस्ती न करता, त्यांच्या भावना आणि प्रश्न समजून घेत, त्यांच्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नातं ठेवावं.
"आज शाळेत काय शिकलात? कोणासोबत काय घडलं?" यासारख्या साध्या पण प्रभावी प्रश्नांद्वारे आपण आपल्या मुलांशी जवळीक साधू शकतो, असे रितेश साबळे यांनी नमूद केले. त्यांनी विशेषत: मुलींना आईने फिजिकली शिक्षण कसे द्यावे, त्यांच्यावर आत्मविश्वास कसा निर्माण करावा याबद्दल देखील महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांच्या या विचारांना उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद देत भरभरून दाद दिली आणि मनापासून आभार मानले.
शेवटी, शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम यांनी प्रत्येक पालकांच्या प्रश्नांना संयमाने आणि सविस्तर उत्तरे देत पालकांना नियमितपणे आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सांगता आनंदमय वातावरणात करण्यात आली.
मुख्य संपादक : सागरजी रोकडे सर
सहसंपादक : संदेशजी भालेराव सर
कार्यकारी संपादक : रितेश साबळे सर
जाहिरातीसाठी संपर्क करा : 8830708522
---




Post a Comment
0 Comments