वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
शेगाव, दि. १ ऑगस्ट २०२५.
डॉ. अण्णा भाऊ साठे नगर, म्हाडा कॉलनी येथील 'आपला दवाखाना' येथे साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती आणि समाज भूषण एस. एम. गवई यांची ७९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिनजी सांगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने लहान मुलांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात दिनेश घुगे सर, सिस्टर विद्या अभौतीकर, मुकेश गवई, सामाजिक कार्यकर्ते नागेश्वर पाटेकर, विनोद सोनोने, मुकेश अजनकार, विष्णु तायड़े, गोपाल तायड़े, राहुल पाटेकर, बंटी तायड़े, भारत तायड़े, नंदाताई मानकर, बिंटूताई पाटेकर, वर्षा गवई, गणेश मानकर, माहळा वसाहतीतील नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक ऐक्य व प्रबोधनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.
हि माहिती रामचंद्र नावकार यांच्या कडून प्राप्त झाली आहे.


Post a Comment
0 Comments