Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

शशांक विद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे अवचित साधून स्मृतिशेष. भारती किशोर सोमकुवर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

{संपादकीय}:-

 शशांक विद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे अवचित साधून स्मृतिशेष. भारती किशोर सोमकुवर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम आयु. किशोर परसराम सोमकुवर (सेवानिवृत्त आयकर अधिकारी) यांच्या वतीने आयोजित करण्यात आले शैक्षणिक साहित्य वाटप व मार्गदर्शन कार्यक्रम थाटात संपन्न....


शशांक माध्यमिक विद्यालय वाडेघर, कल्याण (प.):

दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि स्मृतिशेष भारती किशोर सोमकुवर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम आयु. किशोर परसराम सोमकुवर (सेवानिवृत्त आयकर अधिकारी) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.



या कार्यक्रमात शशांक माध्यमिक विद्यालय, वाडेघर येथील इयत्ता नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांना नवनीत गाईड संच, आठवीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप संच, तसेच पेन, पट्टी, पेन्सिल, खोडरबर यांचे किट वितरित करण्यात आले.


विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याचे सखोल मार्गदर्शन प्रा.डॉ. लक्ष्मण लांडगे सर सोमय्या महाविद्यालय मुंबई यांनी दिले. यानंतर श्री व्ही.एस. मस्के (सेवानिवृत्त आयकर अधिकारी) प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक आयु. शिवाजी रागडे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.तसेच खाऊ वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला एन.डी.एम.जे. मुंबई-ठाणे प्रदेशाध्यक्ष आयु. बंदिश सोनावणे, मुंबई महापालिकेचे सिव्हिल इंजिनिअर आयु. सातेश तायडे, यांची उपस्थिती लाभली.


विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली पाटील मॅडम, सौ. चारुलता कोल्हे मॅडम, श्री. वामन मस्के सर आणि कु. रंजना तिटकरे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले. सर्व पाहुण्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री. संदेश भालेराव यांनी केले. यावेळी कराटे प्रशिक्षक श्री. प्रशांत कसबे यांनी कराटेचे महत्त्व आणि प्रशिक्षणाची गरज यावर मार्गदर्शन केले.


*उपस्थित मान्यवर:-*

के.पी. सोमकुवर,व्ही.एस. मस्के,शिवाजी रगडे,स्वप्नील सोमकुवर,बंदिश सोनावणे,सातेश तायडे,संदेश भालेराव,शशिकांत खंडागळे,धुराचंद्र खंडागळे,प्रेम खंडागळे,वामन मस्के,वैशाली पाटील,चारुलता कोल्हे,रंजना तिटकरे,प्रशांत जाधव.



*हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने ज्ञानदायी आणि प्रेरणादायी ठरला.*

ह्या कार्यक्रमासाठी विशेष श्रम.माजी आयकर अधिकारी किशोर सोमकुवर साहेब व शशिकांत खंडागळे यांनी घेतले.



(रिपोर्ट: वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज)

Post a Comment

0 Comments