वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
रामचंद्र नावकार
दि. 01 ऑगस्ट 2025 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती शहरात उत्साहात व भव्य थाटामाटात साजरी करण्यात आली.
शहरातील विविध भागांमध्ये अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन मंडप उभारण्यात आले होते. काही ठिकाणी नागरिकांसाठी चहा, नाश्ता व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. यानंतर एक भव्य मिरवणूक सिटी कोतवाली येथून सुरू झाली आणि अण्णाभाऊ साठे स्मारक, अण्णाभाऊ साठे चौक येथे समारोप करण्यात आला.
समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा अनुजाती मोर्चा ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण गायकवाड, ॲड. राजेश प्रधान, श्रीकृष्ण चव्हाण, पुरुषोत्तम वाघमारे, सुरेश जाधव, अविनाश जाधव आणि रवि पाटेकर यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकार राजेश अवचार आणि रामचंद्र नावकार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास भाजप आमदार रणधीरभाऊ सावरकर, आमदार साजिद खान पठाण तसेच अनेक कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून आयोजकांचे कौतुक होत आहे.



Post a Comment
0 Comments