वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
कार्यकारी संपादक : रितेश नामदेव साबळे.
जनुना (ता,खामगाव. जिल्हा बुलढाणा)
दिनांक. 01/08/2025 रोजी महाप्रजापती गौतमी बुद्ध विहार, जनुना येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध समाज घटकांच्या वतीने अत्यंत भक्तिभावाने व सुसंस्कृत वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी बहुसंख्य उपासक, उपासिका, मातंग समाजबांधव व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला जनुना गावचे माजी सरपंच व समाजाचे मार्गदर्शक आदरणीय संदीप भाऊ गोरे यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकत समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन केले.
यावेळी आदरणीय सखाराम भाऊ बाभुळकर व त्यांच्या मुलगी सुषमाताई बाभुळकर यांनीही ज्वलंत भाषण करत साठे यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व विषद केले. समाजात परिवर्तन घडवण्यासाठी त्यांच्या साहित्याचे व विचारांचे अनुकरण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
कार्यक्रमात विशेषतः प्रसाद, पुष्पहार, अगरबत्ती, मेणबत्ती व चॉकलेटचे दान सखाराम भाऊ बाभुळकर यांनी केले. तसेच माजी सामनेर सागर भाऊ गवांदे यांनी चटई दान दिले. त्यांच्या या सेवाभावाबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
सिद्धोधन शेजव यांनीही या जयंतीनिमित्त उपस्थित समाज बांधवांना अत्यंत मार्मिक शब्दात मार्गदर्शन केले.
त्यांनी धर्म म्हणजे काय, धर्म काय शिकवतो, याविषयी सखोल विचार मांडून उपस्थितांना धर्माची खरी व्याख्या समजावून सांगितली.
त्यांचे हे विचार मोलाचे ठरले आणि उपस्थितांच्या मनावर ठसा उमटवणारे ठरले.
या कार्यक्रमात रमाई महिला मंडळ, पंचशील बहुउद्देशीय क्रीडा मंडळ, जनुना यांचे सहकार्य लाभले . उपासिका भगिनी, माता, युवक वर्ग, व वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी शेख राजिक भाऊ, सुषमिता ताई आणि राजू खंडेराव काका यांनीही आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने कार्यक्रमाला अधिक समृद्ध केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व संयोजन सर्व समाजबांधवांच्या एकत्रित सहभागामुळे शक्य झाले. मंडळाच्या वतीने उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.



Post a Comment
0 Comments