Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

“ *विकासाचा खोटा चेहरा”*


 “ *विकासाचा खोटा चेहरा”* 


आज महाराष्ट्रात आणि देशभरात विकासाच्या गजरात मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. पण वास्तव वेगळं चित्र दाखवतं. भ्रष्टाचार, भेदभाव, शोषण, महागाई आणि बेरोजगारी या गोष्टींनी सामान्य जनतेचं आयुष्य उध्वस्त केलं आहे.


 गरीबांच्या झोपड्यांवर बुलडोझर, श्रीमंतांची महालं मात्र सुरक्षित ✍️✍️


अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरिबांच्या झोपड्या पाडल्या जातात, वर्षानुवर्षे कष्ट करून उभं केलेलं आयुष्य एका क्षणात उघड्यावर आणलं जातं. पैशाची लांबी दाखवणाऱ्यांचे राजवाडे मात्र सुरक्षित राहतात. गरीबांच्या झोपड्या तोडल्या जातात, त्यांच्या बहिणींचं घर हिरावलं जातं, आब्रूची लूट केली जाते, पण सत्ताधाऱ्यांच्या गुप्त संमतीशिवाय हे घडूच शकत नाही.


 महिलांवर अत्याचार – आकडेवारीचं काळं सत्य 👇


महिलांवर बलात्कार, अपहरण, लूटमारीच्या घटना वाढत आहेत. आजही महाराष्ट्रातील अनेक बहिणी सुरक्षित नाहीत. मणिपूरमध्ये नग्न दिंड काढून महिलांचा अपमान झाला, जगभर या घटनेची नोंद झाली; पण अशा प्रसंगातही ‘राजे’ फक्त आश्वासनं देत राहिले. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.


 शिक्षणापासून वंचित पिढी


महाराष्ट्रात हजारो गावं अशी आहेत जिथे शाळाच नाही. जुलै २०२५ मध्येच ७०० खासगी आणि १०३ अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती झाली नाही, त्यामुळे त्या शाळा बंद होण्याची वेळ आली. मुंबईत गेल्या सहा वर्षांत ४० मराठी शाळांना टाळे लागले, आणि ५० हजार विद्यार्थ्यांची घट झाली. पावसामुळे दरवर्षी अनेक शाळा बंद ठेवाव्या लागतात, विद्यार्थ्यांचं शिक्षण खंडित होतं. पेपर लीकसारख्या घटनांमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. हे कोणत्याही राष्ट्रासाठी कलंकासमान आहे.


 शेतकऱ्यांचे हाल 


मराठवाडा-विदर्भात शेतकऱ्यांची आत्महत्या ही दरवर्षीची दुर्दैवी कहाणी झाली आहे. १९९७ ते २००६ या दहा वर्षांत विदर्भात १.४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. २०१४ मध्ये फक्त मराठवाड्यात ४२२ शेतकरी आत्महत्या केल्या, त्यापैकी २५२ शेतकऱ्यांनी कर्जाच्या ओझ्यामुळे हा टोकाचा निर्णय घेतला. मालाला भाव नाही, खतांचे दर वाढले, पाणीटंचाई कायम — या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे.


 महागाईचा भडका – सामान्य जनतेवर अन्याय


धान्य, दाळी, दूध, तेल, किराणा, मोबाईल रिचार्ज, पेट्रोल अशा सर्वच आवश्यक गोष्टींवर करांचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेल दर वाढले, ए टू झेड वस्तूंवर कर लावला गेला. सामान्य माणसाच्या खिशाला चाट बसली आहे. रोजगाराच्या संधी नाहीत, नोकरभरतीत फसवणूक चालते, बेरोजगारी दिवसेंदिवस वाढते.


 भेदभाव आणि शोषण कायम👇


दलित, मागासवर्गीय, गरीब वर्ग यांच्यावर अजूनही भेदभाव केला जातो. शिक्षण, रोजगार, सुरक्षा, न्याय या सर्व गोष्टींपासून त्यांना वंचित ठेवलं जातं. राज्यकर्त्यांचं बोलणं वेगळं, पण कृती मात्र नेहमीच गरीबांना दारिद्र्यात, असुरक्षिततेत ठेवणारीच असते.



 निष्कर्ष : “विकास” की “लूट”?


आजचा प्रश्न असा आहे की, जर हाच विकास असेल तर मग जुने दिवस काय वाईट होते? लोकांना अन्न, शिक्षण, रोजगार, सुरक्षितता, न्याय मिळत नसेल, तर विकासाच्या नावाने केल्या जाणाऱ्या घोषणा या फक्त ढोंग आहेत.


खरं राजेपण म्हणजे जनतेच्या अश्रूंना हात पुसणं, तिच्या पोटात अन्न भरणं आणि तिच्या लेकरांना शिक्षण देणं. पण आजच्या राजकारणात आश्वासनं मोठी, कृती मात्र उलट आहे. जनता आता विचारतेय – “हा विकास आम्हाला हवा होता का, की ही आमच्या दुर्दैवाची लूट?”

✍️✍️✍️✍️✍️✍️


✍️ लेखक : रितेश नामदेव साबळे

🌺 *कार्यकारी संपादक, वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज .*🌺

Post a Comment

0 Comments