Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

सावरोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न.



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

शंकर गायकवाड

शहापूर तालुका | दिनांक 21 ऑगस्ट 2025

आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता ग्रुप ग्रामपंचायत सावरोली सो आयोजित ग्रामसभा उत्साहात पार पडली. ग्रामपंचायतचे सरपंच मा. मधुकर निरगुडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला सावरोली गावासह सात वाड्यांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. एकूण 156 ग्रामस्थ या सभेला हजर होते.


सभेचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत कर्मचारी मा. निखिल मुंडूला यांनी केले. या ग्रामसभेला उपसरपंच मा. जीवन दवणे, ग्रामसेविका राऊत मॅडम, तसेच सदस्य सविता खोडका, सुवर्णा दवणे, नंदा वाघ, सुवर्ण आत्माराम दवणे, शंकर निरगुडा, लक्ष्मण हिंदोळा आदी मान्यवर उपस्थित होते.


ग्रामपंचायतच्या विविध समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांनी सभेला उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला. नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करत सभेचे कामकाज अत्यंत सुयोग्य पद्धतीने पार पडले.





Post a Comment

0 Comments