वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मनोहर गायकवाड
सोलापूर, (सांगोला) : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील सोनंद गावात हॉटेल मटन भाकरीच्या आड जुगार चालत असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 52 पत्त्यांचा डाव खेळत असताना 50 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये आत्तापर्यंत सर्वात मोठी रक्कम जवळपास 2 कोटी 68 लाख 72 हजार 150 रुपये मुद्देमाल जप्त केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केलीय.
याबाबत सांगोला तालुक्यातील सोनंद याठिकाणी हॉटेल मटन भाकरीच्या सिमेंट पत्र्याच्या खोलीत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. विनापरवाना जुगार क्लब चालवणारे सचिन साहेबराव काशीद (रा. सोनंद, ता. सांगोला) आणि शंभुलिंग प्रकाश तेरदाळ (रा. आथणी जि. बेळगाव) जुगार क्लब चालवत असताना त्यांच्यावर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी रक्कम जुगार अड्ड्यावर मिळाली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याचबरोबर 50 जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये रोख रक्कम 16 लाख 9 हजार 62 रोख रक्कम, 62 मोबाईल, 26 चारचाकी वाहन, 61 दुचाकी वाहने आणि देशी विदेशी दारू असा एकूण 2 कोटी 68 लाख 72 हजार रुपये मुद्देमालासह हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 50 जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, त्याचबरोबर पोलीस कर्मचारी भारत भोसले, अनिल पाटील, दत्तात्रय तोंडले, निलेश डोंगरे, मंगेश रोकडे, संतोष गायकवाड, शितल चव्हाण, राहुल लोंढे, निलेश रोंगे यांनी ही कामगिरी पार पाडली.

Post a Comment
0 Comments